नितीन गडकरींच्या पुढाकाराला यश, वर्ध्यातच तयार होणार रेमडेसीवीर

Remdesivir - Nitin Gadkari

नागपूर : नागपूरसह (Nagpur) विदर्भात असलेली रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनची कमतरता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चार दिवस सातत्याने पाठपुरावा करून वर्ध्याच्या ‘जेनेटेक लाईफ सायन्सेस’ला ३० हजार वायल प्रतिदिन रेमडेसीवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळवून दिली आहे.

रेमडेसीवीर तयार करणाऱ्या गिलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली होती. त्यातील एक कंपनी ‘लोन लायलंस’द्वारा जेनेटिक लाईफ सायन्स रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करेल. साधारण एका आठवड्यात वर्ध्यात रेमडेसीवीरचे उत्पादन सुरू होईल आणि पंधरा दिवसांत ३० हजार वायल प्रतिदिन इंजेक्शन्स विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांत उपलब्ध होतील. गडकरी यांनी कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी अनेक पावले उचलली असून, त्यात विदर्भातच होणारे रेमडेसीवीरचे उत्पादन ही महत्त्वाची उपलब्धी आहे. यासाठी आवश्यक त्या सगळ्या परवानग्या श्री नितीनजी गडकरी यांनी मिळवून दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button