अजितदादांना यश; १७ वर्षांपासून विरोधक असलेले इंदापूरचे नेते आता शरद पवारांसोबत

Indapur Opposition Leaders-Sharad Pawar

इंदापूर : विधानसभा निवडणुकीनंतर अनपेक्षितपणे सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठे बळ मिळताना दिसून येत आहे. त्यातच आता इंदापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची नांदी पाहायला मिळत आहे. तब्बल १७ वर्षांपासून शरद पवारांचे विरोधक असलेले साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार-जाचक भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र पवार आणि पृथ्वीराज जाचक यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ (Dinner diplomacy) झाल्याचे बघायला मिळाले.

पृथ्वीराज जाचक (Prithviraj Jachak) हे सहकार क्षेत्रातील दिग्गज, मात्र काही वर्षांपूर्वी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून दुरावले होते. परंतु ते आता पुन्हा राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहाच्या दिशेने सरकताना दिसत आहेत. मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी जाचक यांनी दुपारचे जेवण घेतले.

राज्यात एके काळी पहिल्या पाच साखर कारखान्यांमध्ये गणला जाणारा भवानीनगर (ता.इंदापुर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे.कारखान्यापुढे सहवीजनिर्मिती प्रकल्प,विस्तारवाढीचेच्या प्रकल्पांचे मोठे कर्ज आहे. कामगारांचे पगार लांबले आहेत.कारखाना अडचणीत गेल्याने ऊसउत्पादक सभासद संभ्रमात आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी माजी अध्यक्ष शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांच्याकडे या कारखान्याचे ‘सारथ्य’ देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यावर सोमवारी(दि ३) मुंबई येथे ‘सिल्व्हर ओक ’ या निवासस्थानी ‘साहेबां’ बरोबर ‘लंच डिप्लोमसी’मध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गेल्या १७ वर्षांपासुन राष्ट्रवादी काँग्रेससोबत असणारी जाचक यांचे राजकीय वितुष्ट यानिमित्ताने संपुष्टात आले आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण करण्यासाठी हात पुढे केला. पृथ्वीराज जाचक यांनी मान्यता दिली आणि शरद पवार यांच्यासोबत भेटीनंतर पुनर्मिलनावर शिक्कामोर्तब झाले. यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबत संकेत दिले होते. मात्र आता पवार-जाचक भेटीमुळे इंदापुरातील राजकीय समीकरण बदलण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER