१६ जणांना भुयारातून जिवंत बाहेर काढण्यास यश

Success in rescuing 16 people alive from the basement

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या (Uttarakhand) जोशीमठ तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. जोशीमठ येथे मोठ्या हिमकडा कोसडल्याने धौली गंगा नदीला (Dhauliganga River) पूर आला आहे. या पुरामुळे अनेक लोक पाण्यात बुडून गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, येथील भुयारात अडकलेल्या १६ जणांना वाचविण्यात आले आहे. आयटीबीपी टीमने दिलेल्या माहितीनुसार २५० जवानांच्या तीन टीम बचावकार्यात गुंतलेल्या आहेत.

भुयारातून बाहेर काढतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये आयटीबीपीच्या टीमने एकाला गाळातून बाहेर काढले आहे. मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आल्याने पुराचे पाणी घराघरात शिरले आहे. परिणामी धरणाजवळची अनेक गाव या पुरात वाहून गेली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER