गुजरातमध्ये एमआयएमला यश; महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष बनला

MIM

सुरत : गुजरातमधील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाने (BJP) विजय मिळवला. भाजपाने सहापैकी सहा महापालिका आपल्याकडे कायम राखल्या. एकूण ५७५ पैकी ४८३ जागा जिंकत भाजपाने निवडणुकीत यश आणले. यात आम आदमी पक्षानेही चांगले यश मिळवले. मात्र काँग्रेसची (Congress) कामगिरी निराशाजनक झाली आहे. यावर शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे.

महापालिका निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला. त्यात आप आणि एमआयएमला चांगले यश आले. भाजपाने अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोट, जामनगर आणि भावनगरमधील सत्ता कायम राखली आहे. सहा महापालिकांमधून काँग्रेसला केवळ ५५ जागा जिंकता आल्या. सूरतमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे आम आदमी पार्टी सूरत महापालिकेत विरोधी पक्ष असेल. एमआयएमलाही गुजरातमध्ये नगरपालिकेत विरोधी पक्ष बनण्याची संधी मिळाली आहे.

गुजरातच्या मडोसा महापालिका निवडणुकीत एमआयएमने १२ पैकी ९ जागा जिंकल्या. यात प्रमुख विरोधी पक्षपदाची जबाबदारी एमआयएमकडेच असणार आहे. एमआयएमचे खासदार इम्तीयाज जलील यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली. तसेच, एमआयएमच्या वर्धापन दिनी असुदुद्दीन औवेसी यांनी गुजरातमधील मोडासाच्या जनतेने भेट दिल्याचे जलील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, विजयी उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.