करून दाखवलं.. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’मुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश : उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे आपण कोरोना संसर्ग (Coronavirus) रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली . मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत संवाद साधला आणि कोविड संदर्भात उपाययोजनांची माहिती करून घेतली.

डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या आहेत.

कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. दिवाळीनंतर पुढचे 15 दिवस जागरुकतेचे आहे. त्यादृष्टीने सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पहा, असेही त्यांनी सांगितले .

दरम्यान या बैठकीत आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉक्टर्स सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER