कन्कशनसोबत सर्व प्रकारच्या जायबंदी खेळाडूंना बदली खेळाडू मिळावा

Concussion substitute

आॕस्ट्रेलियाविरुध्दच्या पहिल्या टी-20 सामन्यात रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) जागी कन्कशन सबस्टिट्यूट (Concussion substitute) म्हणून संधी मिळालेला युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) थेट सामनावीर ठरल्यानंतर या नियमाची चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आॕगस्ट 2019 पासून हा नियम बनवला. त्यानंतर पहिल्यांदाच कन्कशन सबस्टिट्यूट खेळाडू सामनावीर ठरला.

या नियमानुसार डोक्याला चेंडू लागल्यानंतर मेंदूचे काम प्रभावीत झाले असेल तरच ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ दिला जातो. परंतु केवळ डोक्याला मार लागल्यावरच आणि मेंदूवर परिणाम दिसत असेल तरच बदली खेळाडू देण्यापेक्षा सर्वच प्रकारच्या दुखापतींसाठी बदली खेळाडू देण्यात यावा अशी मागणी पुढे आली आहे. जो खेळाडू कोणत्याही प्रकारच्या दुखण्यामुळे खेळू शकणार नसेल त्याला बदली खेळाडू द्यावा असा विचार आहे.

ही मागणी मान्य झाल्यास जायबंदी फलंदाजाच्या जागी ‘रनर’ देण्याचीसुध्दा गरज पडणार नाही. मात्र हे करताना सध्याच्या कन्कशन नियमात एक महत्त्वाचा बदलही सुचविण्यात आला आहे.

हल्ली खेळाडूची स्थिती खेळण्यायोग्य नाही आणि त्याला ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ देण्याची गरज आहे हे त्या खेळाडूच्या संघाचेच डॉक्टर व फिजिओ ठरवतात. त्यांच्या अहवालावरच मॕच रेफरी बदली खेळाडू द्यायचा की नाही याचा निर्णय घेत असतात पण हे ठरविण्यासाठी तटस्थ डॉक्टर व फिजिओ असावेत, जेणेकरुन गैरप्रकार घडणार नाहीत, नियमाचा गैरफायदा घेतला जाणार नाही असा विचार पुढे आला आहे.

यावर आयसीसी निर्णय घेईल तेंव्हा घेईल पण आता युझवेंद्र चहलच्या यशाने ही चर्चा सुरु झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER