पंतप्रधान कार्यालय निरुपयोगी, मोदींनी कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्त्व नितीन गडकरींकडे सोपवावे ; भाजप खासदाराची मागणी

Nitin Gadkari - Maharashtra Today

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत . या संकटमय काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांनी आपला जीवही गमावला . पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालय हे निरुपयोगी आहे. देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी आता नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर सोपविली पाहिजे, असे मत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanian-swamy)यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत .

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत म्हणाले की , भारताने मुस्लीम आक्रमक आणि ब्रिटीश साम्राज्यशाहीचे संकट ज्याप्रमाणे परतावून लावले तसेच कोरोनाच्या संकटानंतरही भारत तग धरून राहील. नियमांचे पालन न केल्यास भारताला कदाचित कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi) यांनी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे सोपवायला हवीत. पंतप्रधान कार्यालयावर विसंबून राहणे, हे निरुपयोगी ठरेल, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळीक दिली आहे. मात्र, अतिनम्र स्वभावामुळे त्यांना ते सर्व निर्णय प्रभावीपणे राबवू शकत नाहीत. नितीन गडकरी त्यांच्या मदतीला आल्यास डॉ. हर्ष वर्धन अधिक खुलून काम करतील, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button