‘पंतप्रधान मोदींनी गडकरींचा प्रस्ताव स्वीकारायचा होता’; सुब्रमण्यन स्वामींची टीका

Subramanian Swamy

नवी दिल्ली : भाजपचे नेते सुब्रमण्यन स्वामी (Subramanian Swamy) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर (PM Modi) टीका केली आहे. देशातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. यावरून सुब्रमण्यन स्वामींनी (Subramanian Swamy) पंतप्रधान मोदींवर काही दिवसांपूर्वी टीका केली. आता पुन्हा त्यांनी ट्विट करून मोदींना लक्ष्य केले आहे. नितीन गडकरींबाबाबतचा (Nitin Gadkari) प्रस्ताव स्वीकारला असता तर बरे झाले असते, असे स्वामींनी म्हटले.

गडकरींकडे जबाबदारी द्यायला हवी होती
देशात स्थिती गंभीर होत आहे. यामुळे कोरोनाविरोधी लढाईची सूत्रे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हातात द्यायला हवी, असा प्रस्ताव स्वामींनी दिला होता. हा प्रस्ताव स्वीकारला असता तर आज कोरोनाची स्थिती सरकारच्या चौकटीत असती. मात्र, कोरोना स्थितीवर आता सुप्रीम कोर्टाने समिती नेमली आहे. सॉलिसिटर जनरल कोर्टाला शरण गेले आहेत. आता सरकारला कोर्टाचे ऐकावे लागणार आहे. लोकशाही देशात हा एक प्रकारे सरकारचा पराभव आहे, अशी टीका सुब्रमण्यन स्वामींनी केली.

गडकरींच्या नेतृत्वावर स्वामींना विश्वास
सुब्रण्यन स्वामींनी ५ मे रोजी ट्वीट केले होते. “भारताने इस्लामिक आणि ब्रिटिश घुसखोरांचाही सामना केला आहे. योग्य पावले उचलली नाहीत तर कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो, यात लहान मुलांना अधिक धोका उद्भवू शकतो. अशावेळी पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे व्यर्थ आहे. पंतप्रधान मोदींनी या युद्धाची जबाबदारी नितीन गडकरींना सोपवावीत.” असे सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले होते. ह्या संकटाशी सामना करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करावी लागते. यामध्ये नितीन गडकरी यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे, असा विश्वास सुब्रमण्यम स्वामींनी नितीन गडकरींच्या नेतृत्वावर व्यक्त केला आहे.


Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button