सुशांतला अस्थिर करण्यासाठी विषकन्येकडून ड्रग माफियांची मदत – सुब्रमण्यम स्वामी

Sushant Singh Rajput death case-Subramaniam Swamy

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी भाजपचे (BJP) खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी आणखी एक दावा केला आहे. लोक मला विचारतात की, सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल तुमचे मत काय आहे? यावर माझे मत असे आहे की, जर पुरावा नष्ट केल्यामुळे सीबीआय (CBI) खरा  मारेकरी ओळखू शकली  नाही तर हे सिद्ध केले जाऊ शकते की, सुशांतचे मन अस्थिर करण्यासाठी विषकन्येने बॉलिवूडच्या ड्रग माफियांची मदत घेतली होती.

करिअर नष्ट होण्याच्या चिंतेसह भ्रमनिरास झाला होता. करारांची खात्री करण्यासाठी सुशांत दिशावर अवलंबून होता. पण तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे सुशांतचे मानसिक संतुलन बिघडले. त्यानंतर विषकन्येने त्याला वाऱ्यावर सोडून दिले. आणि निराशा काय असते याचा विचार करायला भाग पडले- असे स्वामी म्हणाले आहेत. त्याला ड्रग देऊन आत्महत्या केल्याचे भासवण्यात आले. म्हणूनच, सीबीआयला खरा मारेकरी सापडला नाही.  सुशांतने जरी फाशी घेऊन आत्महत्या केली असेल, विषकन्या कलम ३०६, फसवणूक आणि अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये दोषी आहे आणि ती जन्मठेपेसाठी तुरुंगात जाईल. तिच्यासोबत कट रचणारेही तुरुंगात जातील, असे स्वामी यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER