दिल्लीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ करा ! भाजपा खासदाराची मागणी

Subrahmanyam Swamy

दिल्ली :- राजधानी दिल्लीचे (New Delhi) नाव बदलून इंद्रप्रस्थ (Indraprastha) करा, अशी मागणी भाजपाचे नेते, राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी केली आहे. यासाठी त्यांनी डॉ. नीरा मिश्र यांनी केलेल्या संशोधनाचा हवाला दिला आहे.

या संदर्भात सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्विट केले – ‘हिंदूंच्या पुनर्जागरणासाठी दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ केले पाहिजे. यासाठी द्रोपदी ट्रस्टच्या डॉ. नीरा मिश्र यांनी केलेला अभ्यास पुरेसा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संबंधित मंत्र्यांना याबाबत सूचना दिल्या पाहिजेत.

दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ केल्याशिवाय देशातील प्रश्न सुटणार नाहीत, असे मला तामिळनाडूच्या एका महान संताने सांगितले आहे, असा उल्लेखही स्वामी यांनी ट्विटमध्ये केला आहे.

डॉ. नीरा मिश्र यांनी संशोधनात याबाबतचे पुरावे गोळा केले आहेत. त्यानुसार दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ असल्याचे सिद्ध होते. महाभारतातही इंद्रप्रस्थ नावाचा उल्लेख आहे. तसेच इंद्रप्रस्थबाबतचे पुरावे ब्रिटिश सरकारच्या १९११ च्या अधिसूचनेतही सापडतात. भारतीय पुरातत्त्व सर्व्हेक्षण नोंदवहीत ब्रिटिश आणि मुघलांनी इंद्रप्रस्थ नावाचा उल्लेख केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button