कोल्हापूर शहराची हद्दवाढ फेरप्रस्ताव सादर करा : एकनाथ शिंदे

कोल्हापूर :- ‘कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी सर्वतोपरी मदत करु यासाठी सरकारकडे फेरप्रस्ताव सादर करा’अशा सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. मंत्री शिंदे यांनी आज कोल्हापूर महापालिकेला भेट देऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला. महापालिकेने फेरीवाले पुनर्वसनासाठी जे उद्दिष्ट दिले होते त्यांनी हे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल अभिनंदनही केले.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, उर्वरीत विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ योगेश जाधव, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, राज्याच्या नगरविकासच प्रधान सचिव महेश पाठक, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.

उपायुक्त निखिल मोरे यांनी स्लाईड शोद्वारे महापालिकेच्या कामांची माहिती दिली. विकासकामांचे सादरीकरण केले. महापालिका इमारत ही ऐतिहासिक वारसा असलेले आहे त्यामध्ये बदल करणे शक्य नाही त्यामुळं महपालिकेने आरक्षित केलेल्या निर्माण चौक येथील जागेमध्ये महापालिकेची प्रशस्त इमारत बांधण्यासाठी ६५ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी आवश्यक तो निधी मंजूर करावा’ अशी विनंती केली. माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या बोर्डिंगला सरकारने अर्थसहाय्य करावे’अशी मागणी केली.

मंत्री शिंदे म्हणाले, ‘शहरातील जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यासंबंधीचे प्रस्ताव सरकारकडे पाठवा ते तात्काळ सोडवू. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे कामही लवकर करू.रंकाळा तलाव सुशोभीकरणासाठी आवश्यक तो निधी देऊ. शाहू मिल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चां करून लवकरच याबाबत निर्णय घेऊ. ’

ही बातमी पण वाचा : राजर्षी शाहू महाराज समाधी दुसरा टप्पा सुशोभीकरण ५ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER