‘बाळासाहेबांनी दिलेला आदेश आमच्यासाठी पूर्व दिशा’, औरंगाबादचे संभाजीनगर करणारच

Subhash Desai on Chandrakant Patil

मुंबई :- औरंगाबादचे नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्याच्या मुद्द्यावरुन भाजपकडून शिवसेनेची सातत्याने कोंडीकरण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी भाजपला चांगलेच खडे बोल सुनावले. नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजप शिवसेनेला टोमणे मारते. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना औरंगाबादच्या नामांतराविषयी इतकीच बांधिलकी होती तर तुमचे सरकार असताना हा निर्णय का घेण्यात आला नाही? तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का, असा खरमरीत प्रश्न सुभाष देसाई यांनी भाजपला विचारला.

औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडणाऱ्या भाजपचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय का घेण्यात आला नाही? त्यामुळे आता भाजपने आम्हाला उपदेश करण्याची गरज नाही. आमचं कर्तव्य म्हणून आम्ही औरंगाबादच्या नामांतरासाठी प्रयत्न करत आहोत आणि आम्ही ते करणारच, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन आम्हाला राजकारण करायचे नाही. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा दिलेला आदेश आमच्यासाठी पूर्व दिशा आहे. पाच वर्षांच्या कालावधीत औरंगाबादचे नामांतर होणार का, माहिती नाही. ते सांगायला मी काही ज्योतिषी नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये सत्ता कोणाची होती, त्यावेळी सत्ता भोगणारे कोण होते? मात्र, त्यावेळी औरंगाबादचे नामांतर त्यांच्यासाठी प्राधान्याचा मुद्दा नव्हता. आता त्या मुद्द्यावरुन राजकारण करुन फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेला हे सर्व माहित आहे, असे सुभाष देसाई यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : “औरंगाबादचे नाही, तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करा”, प्रकाश आंबेडकरांची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER