सुभाष बाबूंचा ‘तो’ सेनानी ज्यांच्यामुळं मिळाला ‘जय हिंदचा’ नारा!

Abid Hassan

नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) भारताच्या स्वातंत्र्यासाठी टोकाचा संघर्ष करत होते. हिटलरच्या मदतीनं हिटलरच्या भेटीसाठी त्यांनी बर्लिन गाठलं होतं. त्यांच मत होतं की भारताला स्वातंत्र्य केवळ सशस्त्र आंदोलनच देऊ शकतो. त्यांच्या या विचारामुळंच स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात बलिदानासाठी हजारोंची फौज उभी झाली होती.

नेताजींचे दोन उद्देश होते. सार्वभौम भारताच्या स्थापना करण्यासाठी त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्यांना प्रतिसरकार उभं करायचं होतं. त्यांनी जमवलेल्या ५० हजार सैनिकांच्या जोरवर हे सहज शक्य होतं. ज्यात अधिकतर भारतीय सैनिक होते. ‘रोममेल आफ्रिका कॉर्प्स’नं यांना बंदी बनवलं होतं. यात भारतीय युद्ध कैद्यांचाही सामावेश होता.

नेताजींना आझाद हिंद सेना एक शक्तीशाली सेना बनवायचं होतं. जर्मन लष्कारांच्या तोडीस तोड प्रशिक्षण भारतीय सैनिकांना मिळावं अशी त्यांची इच्छा होती. भारतीय स्वातंत्र्य हे त्यांच एकमेव लक्ष होतं. असं करण्यासाठी सैनिकांमध्ये पराकोटीचं शौर्य आणि आत्मविश्वास जागृत करणं भाग होतं. नेताजींसाठी हे मोठं आव्हान होतं. भारतीय सैन्य स्वतःला जाती, धर्माच्या कुंपनात स्वतःला बंदिस्त करुन घेत होतं. याचं कारण होतं की इंग्रज सैनिकांची जातीअधारित तुकडी बनवायचे. राजपूत, बलूची, गोरखा, सिख इत्यादी.

या समस्येतून मार्ग काढण्यासाठी नेताजी धर्माधारित अभिवादन जसे की हिंदूंचे ‘राम- राम’ शिखाचे ‘सत् श्री अकाल’ यांना हटवून एका अशा अभिवादानाचा अंगिकार करु इच्छित होते ज्यामुळं कुणाच्याच धर्माची ओळख कुणाला होणार नाही. सैनिकांमधील अंतर यामुळं मिटेल अशी सुभाष बाबूंना उमेद होती. त्यामुळंच त्यांनी ‘जय हिंद’ या घोषणेचा स्वीकार केला.

‘जय हिंद’ची घोषणा

आबिद हसन (Abid Hassan) हे हैद्राबादच्या एका मध्यमवर्गीय सुधारणावादी कुटुंबात जन्मले. त्यांच्यावर लहानपणापासून गांधींचा पगडा होता. किशोरावस्थेत ते गांधींचे अनुयायी बनले. काही वेळ ते गांधीसोबत साबरमती आश्रमासमोर राहिले होते. पुढच्या काळात त्यांनी इंग्लंडच्या विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश केला. आबिद यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवण्यासाठी जर्मनीला जायचं ठरवलं. तिथंच १९४१ साली त्यांची भेट सुभाष बाबूंशी झाली. सुभाष बाबूंसोबत त्यांनी युद्ध कैद्यांना भेट दिली.

सुभाष बाबूंपासून ते प्रेरित झाले. अभ्यास सोडून देशकार्यात सहभाग घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अभियांत्रिकी सोडून त्यांनी सुभाष बाबूंच्या स्वीकृत सहाय्याकाचं काम सुरु केलं. नंतर त्यांनी आझाद हिंद सेनेत सैनिकी प्रशिक्षण घेतलं. सुभाष बाबूंनी सांगितलं होतं की सैनिकांमध्ये बंधुभाव वाढावा यासाठी आबिद यांनी काम करावं. जाती धर्माच्या साळख्या आधी तुटल्या तर स्वातंत्र्याची लढाई लढता येईल जिंकता येईल.

अबादी यांनी सल्ला दिला की सैनिकांना अभिवादन करताना ‘जय हिंद’ अशी घोषणा द्यावी. त्यांचा सल्ला छोटा होता पण प्रंचड प्रभावकारी ठरला. नेताजींनी त्वरीत याला स्वीकृती दिली. क्रांतीकाऱ्यांनी अभिवादनासाठी जय हिंद वापरायला सुरुवात केली. रोजच्या भाषेत याची चर्चा होऊ लागली. पुढं चालून भारताचा पहिला राष्ट्रीय नारा म्हणून ही घोषणा प्रसिद्धीस पावली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७च्या ऐतहासिक भाषणात हा नारा वापरला.

१९४२ साली सुभाष बाबू आशियाच्या दौऱ्यावर होते. हा प्रवास एका जर्मन पाणबुडीतून सुरु होता. प्रवासात आबिद चेष्टा मस्करी करत होते, तर नेताजी जपान्यांशी भेटून सल्ला मसलत काय करावी यावर विचार करत होते. रात्री दोन वाजेपर्यंत ते हे नियोजन करत राहिले.

अबिद यांनी लढलं युद्ध

आबिद यांनी १९४४ मध्ये ४ महिने इम्फाळचं युद्ध लढलं. याला सर्वाधिक वेळ चाललेलं युद्ध मानलं जातं. दुर्भाग्यानं या युद्धात पराभवाचा सामना करावा लागला. आबिद खिन्न मनानं रंगुनला परतले. ऑगस्ट १९४५ ला सुभाष बाबू सिंगापूरहून टोकियोला निघणार होते. या दरम्यान आबिद त्यांच्या सोबत राहणार होते; पण काही कारणामुळं आबिद त्यांच्या सोबत गेले नाहीत. विमानाचा अपघात झाला. सुभाष बाबूंचा मृत्यू झाला. यानंतर आबिद यांना अटक झाली. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला.

दुसऱ्या महायुद्धाच्या अंतानंतर त्यांना १९४६ साली मुक्त करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी काही काळ राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये काम केलं. स्वातंत्र्यानंतर ते भारतीय विदेशी सेवेत रुजु झाले. १९६९ साली ते डेनमार्कमध्ये राजदूत पदावरुन निवृत्तजाले. १९८४ साली त्यांच वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button