सुभद्रा लोकल एरिया बँक लि. चे परवाना रद्द : आरबीआयचा निर्णय

RBI - Reserve Bank Of India

कोल्हापूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकेच्या नियमन कायदा १९४९ च्या कलम २२ (४) अन्वये कोल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया बँक लिमिटेड , महाराष्ट्र यांना दिलेला बँकिंग परवाना रद्द केला. याबाबचे आदेश आरबीआयचे मुख्य सरव्यवस्थापक योगेश दयाल यांनी गुरूवारी दिले. मात्र, ठेवीदारांनी हवालदिल होवू नये. ठेवी परत करण्याइतपत बँकेची आर्थिक तरलता असल्याचे आदेशात म्हटले आहे.

सध्याच्या आणि भविष्यातील ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक अशा प्रकारे सुभद्रा लोकल एरिया बँक लि. ने कामकाज केले गेले आहे. २०१९-२०२०च्या आर्थिक वर्षात बँकेने दोन तिमाहींसाठी किमान निव्वळ किंमत नियमाचा (मिनिमम नेटवर्थ) भंग केला असल्याची कारणे आरबीआयने परवाना रद्द करताना दिली आहेत. यापुढे बँक नियमन कायदा ५ (ब) नुसार बँकेला यापुढे कसलाही व्यवहार करता येणार नाही. दरम्यान, सुभद्र बँकेच्या कोल्हापुरात सुरूवातीला तीन शाखा कार्यरत होत्या. मात्र गेल्या काही दिवसापासून एक शाखा कार्यरत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER