सांगली मार्केट कमिटीमध्ये पोट भाडेकरुचा गोरखधंदा

सांगली मार्केट यार्ड

सांगली : सांगली मार्केट यार्डात (Sangli Market Yard) प्लॉटभाड्याचा ‘गोरखधंदा’ जोरात आहे. बाजार समितीला वार्षिक तीन ते पाच हजार रुपये प्लॉटभाडे मिळते. मात्र, अनेक प्लॉटधारकांनी दुकान/दुकानाचा काही भाग 3 ते 5 लाख रुपये वार्षिक भाड्याने दिला आहे. शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार व पूरक व्यवसायाव्यतिरिक्त अन्य व्यवसायही फुलले आहेत.

सांगली मार्केट 99 एकर जागेवर वसले आहे. हे मार्केट यार्ड शेतीमालाची प्रमुख उतारपेठ आहे. शेतमालाच्या खरेदी- विक्रीची वार्षिक सुमारे एक हजार कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होते. हळद, गुळ, बेदाणा, मिरची या शेतीमालाची उलाढाल मोठी आहे. त्याचबरोबर मार्केट यार्डात शेतीपूरक व्यवसाय तसेच शेतीशी काहीही संबंध नसणारे व्यवसायही फुलले आहेत. शेतीमालाची खरेदी-विक्री करणाऱ्या काही अडते, व्यापार्यांना प्लॉट, गाळा मिळत नाही. मात्र, शेतीमाल अथवा शेतीमाल पूरक नसणारे व्यवसाय जोमात आहेत. काही अडते, व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.

मार्केट यार्डात प्लॉट 395, मिनी प्लॉट 60, ट्रेडर्स कॉम्प्लेक्स गाळे 78 आहेत. त्यापैकी 103 प्लॉट हे शर्ती- खरेदीचे, 49 प्लॉट हे इतर व राखीव आहेत. भाडेवसूलपात्र प्लॉट 243 आणि मिनी प्लॉट 60 आहेत. भाडेवसूलात्र गाळे 78 आहेत. प्लॉट 5 हजार चौरस फुटापेक्षा मोठे, पाच हजार चौरस फुटाचे व त्याहून कमी आकाराचेही आहेत.

प्रति चौरसफूट 40 पैसे वार्षिक भाडे आहे. शेतीमालाच्या व्यापाराला चालना मिळावी. उलाढाल मोठ्या प्रमाणावर व्हावी व सेसच्या रुपाने उत्पन्न मिळावे हा बाजार समितीचा उद्देश कमी भाडे आकारण्यामागे होता. मात्र, अनेक व्यापाऱ्यांनी कायदा धाब्यावर बसवून पोट कुळे ठेवली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER