उपविभागीय पेालिस अधिकारी पथक औरंगाबाद ग्रामीण यांची अवैध गुठख्यावर कारवाई

Gutka Seize

औरंगाबाद : फुलंब्री हद्दीतील पाल या गावात संतोष जाधव यांच्या भाड्याने घेतलेल्या घरात अवैध गुटखा असल्याची माहिती डॉ विशाल नेहूल औरंगाबाद ग्रामीण उपविभाग यांच्या पथकाला गुप्त बातमीदार मार्फत मिळाली. त्यानुसार पोलिस ठाणे फुलंब्री तालुक्यातील पाल गावात राहणारा संतोष जाधव यांच्या घरावर छापा टाकला असता, अंदाजे दोन लाखाचा हिरा, विमल, गोवा , राजनिवास, अशा नावा चा गुठखा सापडला. त्यावर फुलंब्री पोलिस ठाण्याचे पीएसआय वाघमारे, व पथकातील अनिल जायेभाये आणि रामेश्वर चेळेकर हे पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

सदर कामगिरी पोलिस अधिकक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वाघमारे व पोलिस कर्मचारी अनिल जायभाये, रामेश्वर चेळेकर जाधव आदींनी केली.