करा ‘क्लासी हेअर कट’….

Hair cut

बऱ्याच महिला केसांना खूप जपतात. कारण लांब, काळेभोर केस हा सौंदर्याचा आरसा असतो. त्यामुळे काहींना लांबसडक केस खूप आवडतात. परंतु सध्या महिला आपल्या केसांचा हेअरकट, हेअरकलर यांच्याबाबत जास्त सतर्क असल्याचे दिसून येत आहे. यासाठी त्या वेगवेगळे प्रयोगही करीत असतात. पण कधी कधी हे प्रयोग तुमच्या पर्सनॅलिटी वर भारी पडू शकतात. अस होऊ नये म्हणून आज आम्ही असे काही हेअर कट सांगणार आहोत, जे तुमच्या आत्मविश्वासात भर घालण्याबरोबरच तुमचं व्यक्तीमत्वही बदलतील.

bob cutबॉब कट :- प्रमाणापेक्षा जास्त लांब केसही सौदर्यामध्ये अडथळा आणू शकतात. अशा तरुणींना बॉब कट करण्याचा सल्ला देण्यात येतो. हा हेअरकटमध्ये केसांची लांबी खांद्यापेक्षा थोडी कमी ठेवल्यास तो जास्त आकर्षक दिसतो. तसेच चेहरा लहान असणाऱ्या मुलींनी हा कट करतांना तो थोडा फुलविल्यास चेहरा उठून दिसतो. बॉब कट केल्यावर एक वेगळाच ग्लॅमरस लुक येऊन तुमच्यातला आत्मविश्वास आपोआप वाढला जातो. तसेच हा हेअर कट केल्यावर केसांना रंग द्यायची इच्छा असेल तर अशा महिलांनी रेड, पर्पल. चॉकलेट, ब्राऊन यासारखे या रंगांची निवड करावी. हे रंग या हेअर कटवर अधिक खुलून दिसतात.

ही बातमी पण वाचा : काॅलेजसाठी ट्रेंडी हेअरस्टाईल

graduated hair cutग्रॅज्युएट हेअर कट :- कामाच्या गडबडीमध्ये लांब आणि घनदाट केस सांभाळणे अशक्य आहे. मात्र हे अशक्य केस मॅनेज करायचे असतील तर आपल्या चेहऱ्याला अनुरुप अशी केसांची रचना करणेही आवश्यक आहे. त्यामुळे अशा महिलांनी किंवा मुलींनी ग्रॅज्युएट हेअर कट केल्यास लांब केस सांभाळणे सोपे जाते. मात्र हा हेअर कट अधिक उठावदार करायचा असेल तर या कटमध्ये केसांची लांबी खांद्यापर्यत ठेवावी. हा कट स्टेप कटप्रमाणेच दिसून येतो.

layer hair cutलेअर्स कट :- ज्या महिलांचे केस लांब आणि स्मुथ आहेत अशा महिलांना लेअर कट हा कट जास्त शोभून दिसतो. यामध्ये केस टप्प्याटप्प्याने कापले जातात. त्यामुळे केस खालपासून वरपर्यंत एक एका लेअरमध्ये दिसून येतात. ज्या महिलांचा चेहरा लांब आहे अशा महिलांना हा कट अधिक चांगला दिसत त्यांच्या आत्मविश्वासात भर पडल्याचे अनेक वेळा पहायला मिळाले आहे.

ही बातमी पण वाचा : स्टायलिश दिसण्याच्या नादात करू नका ‘या’ चुका…

curly haircutकर्ली हेयर :- कर्ली हेअर सांभाळणं म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरतच असते. मात्र अशा केसांसाठीही काही पर्याय उपलब्ध आहेत. हे केस चिन लेंथपर्यंत कापल्यास एक वेगळा लूक येतो. मात्र जर तुम्हाला मोकळे केस ठेवणे पसंत असेल तर अशा महिलांनी सॉफ्ट लेअर्ससह त्यांची लांबी शोल्डरपर्यंत ठेवावी.

straight hair cutस्ट्रेट हेअरकट :- स्ट्रेट कट या प्रकारामध्ये केसांची ठेवण नावाप्रमाणेच सरळ ठेवली जाते. ज्या महिलांचे केस सांभाळणे कठीण असतात किंवा कर्ली असतात अशा अनेक महिला या कटचा पर्याय निवडतात. मात्र हा कट केल्यानंतर केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. साधारणत: हा कट सर्वच प्रकारच्या चेह-यांला सुट होतो. त्यामुळे हा कट कोणत्याही वयोगटातील महिला करु शकतात.

ही बातमी पण वाचा : आता ‘चष्म्या’ने दिसा स्टायलिश ….

थिन हेअर :- थिन हेअर असलेल्या महिलांनी केसांची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असून असे केस असणाऱ्या महिलांनी रंग देणे, केस कापणे यासारखे वेगवेगळे प्रयोग शक्यतो करु नयेत. तसेच हे केस फुलविण्यासाठी ते शोल्डरपर्यंत कापावेत. या केसांना सॉफ्ट वेव्स करत पर्म देखील करता येऊ शकते. याव्यतिरिक्त सॉफ्ट टेक्सचर्ड बॉब कटदेखील या केसांवर खुलून दिसेल. केसांची घनता बऱ्यापैकी असल्यामुळे या केसांना विशेष जपावे लागते. केस गळणे, कोंडा होणे यासारख्या समस्यांपासून वाचण्यासाठी शक्यतो केसांची जास्त निगा राखणे गरजेचे आहे. थिन हेअर असलेल्या महिलांनी केसांना सुट होईल अशा साबणाचा, शॅम्पूचा वापर करावा.