घरच्या पेक्षाही सुंदर जेवण देत असल्याबद्दल आपले शतशः ऋणी राहू; विद्यार्थ्यांनी मानले रोहित पवारांचे आभार

Rohit Pawar

पुणे : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे तसेच इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने पुण्यासारख्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत. लॉकडाऊन मुळे सर्व हॉटेल, खानावळी बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे जेवणाचे खूप हाल होत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या “सृजन फौंडेशन” व “एमपीएससी स्टुडंट राईट” च्या पुढाकाराने विध्यार्थ्यांची गैरसोय ओळखून मोफत जेवण व्यवस्था सुरू केली आहे.

बीडसाठी पुन्हा धावले शरद पवार आणि रोहित पवार, तात्काळ केली मदत; धनंजय मुंडेंनी मानले आभार

पुण्यातील काही महत्त्वाच्या २१ ठिकाणी दुपारी १.00 ते १.३० व सायंकाळी ८.00 ते ८.३० या वेळेत जेवण देण्यात येत आहे. यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पुलाव, पुरी- भाजी, चपाती – भाजी इत्यादी. जेवण देत आहोत. दररोज १९०० ते २००० विध्यार्थ्यांना फुड पॅकेटची वाटप केली जात आहे. अश्या या कठीण प्रसंगी मदत केल्याने या विद्यार्थ्यांनी रोहित पवार यांचे मनापासून आभार अँनले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरच्या पेक्षाही सुंदर जेवण उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी राहू, असे म्हणत या विद्यार्थ्यांनी रोहित पवार यांचे मनापासून आभार मानले आहे.