JEE आणि NEET च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा

Mumbai Local - JEE & NEET Exams

मुंबई : कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला असतानाच JEE आणि NEET परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण असतानाच दिलासादायक बातमी आली आहे. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रेल्वेच्या निर्णयानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास सूट देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचं ऍडमिटकार्ड पाहून त्यांना रेल्वे स्टेशनवर येऊ दिलं जाईल. गर्दी टाळण्यासाठी परीक्षेच्या दिवशी रेल्वे स्थानकावर अतिरिक्त तिकीट काऊंटर सुरू केले जाणार आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात लोकल सेवा बंद करण्यात आली होती. नंतरच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्यात आली. अनलॉकचा चौथा टप्पा सुरू झाला तरीही मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही. आता प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकल प्रवाशाची मुभा देण्यात आली असली तरी इतरांना मात्र प्रवेश देणार नसल्याचं स्पष्टीकरण रेल्वेने दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER