मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचे दंडवत आंदोलन

Maratha reservation

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयात (SC) स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरात आंदोलनाचा धुरळा सुरू आहे. या आंदोलनात कोल्हापुरातील शालेय विद्यार्थ्यांनी उडी घेतली आहे. कोल्हापुरात आज शालेय विद्यार्थ्यांनी दंडवत मोर्चा काढला. कोरोना महामारी सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांबाबत प्रशानाने आदेश जारी केले आहेत. लहान मुलांना आंदोलनात सहभागी करणे कायद्याला धरून नाही.

त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी दंडवत आंदोलन (Students movement) केल्याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्यांसह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवू न शकल्याने राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज कोल्हापुरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उत्तरेश्वर पेठमधील कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी उत्तरेश्वर मंदिर ते अंबाबाई मंदिर असा दंडवत घालण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER