पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी होणार थेट पास; वर्षा गायकवाड यांचा निर्णय!

Varsha Gaikwad Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात १ ते ८ वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट पास करणार आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यातील सर्वच शाळा जवळपास बंदच आहेत. मात्र, अजूनही पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू झाले नाहीत. तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा मध्यंतरी सुरू केल्या होत्या. केवळ, ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगलच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले होते, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांपर्यंत विविध माध्यमांतून शिक्षण पोहचावे. त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठीही आपण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, १ ते ८ वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक मूल्यमापन संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेत असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. देशातील मोफत शिक्षण कायद्याच्या अंतर्गत (RTE) या विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करणे आवश्यक आहे. मात्र, यंदा ते शक्य नाही. पहिली  ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट पास करण्याचा निर्णय वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. तसेच, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठीचाही निर्णय लवकरच जाहीर करू, असेही शिक्षणमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button