दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्यास आंदोलन करू; विद्यार्थ्यांचा इशारा

पुणे : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona Outbreak) राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा (10th-12th exams) पुढे ढकलल्या. या निर्णयामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा (Students Protest) इशारा दिला आहे. या विध्यार्थांकडून परीक्षा पुढे ढकलण्याला विरोध आहे. एकतर या परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा रद्द तरी करून टाका, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता शिक्षण खाते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यावर काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

तत्पूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडीओ अपलोडकरून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण काय?

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील उपस्थित होते. दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बराच खल झाला. सध्याच्या स्थितीत परीक्षा ऑफलाईन घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. ऑनलाईन घेतल्यास ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे, अवघड होईल, असा मुद्दा चर्चेत पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते बैठकीत घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button