१०६ वर्षांपूर्वीच्या रस्त्यासाठी ७४ कोटी देण्याची धडपड ! किरीट सोमय्यांचा आरोप

Kirit Somaiya - CM Uddhav Thackeray

मुंबई : अंधेरीत महाकाली लेणीजवळ १०६ वर्षांपूर्वी रस्ता बांधण्यात आला आहे. या रस्त्याच्या बदल्यात उद्योगपती विनोद गोयंका, शाहिद बलवा आणि अविनाश भोसले यांच्या कंपनीला ७४ कोटी रुपये भरपाई देण्याचा घाट घातला जात आहे. हा एक मोठा घोटाळा आहे, असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर केला. (Kirit Somaiya allegation on Thackeray Government).

सोमय्या यांनी आज पत्रपरिषद घेऊन आरोप केला की, बिल्डर आणि मुंबई महापालिकेच्या संगनमताने भ्रष्टाचार होतो आहे. अंधेरीत महाकाली लेणी आहे. हा भाग पुरातत्त्व  विभागाशी संबधित असल्याने केंद्र सरकारच्या मालकीचा आहे. या लेणी पुरातन आहेत. इथे १९१४ साली रस्ता बनवण्यात आला. त्यावेळी ही जागा मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतही नव्हती! (Kirit Somaiya allegation on Thackeray Government). या परिसरात कमाल अमरोही स्टुडिओ होता. हा स्टुडिओ २०१४ ला महाल फीचर्स प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीने विकत घेतला.

या कंपनीत विनोद गोयंका, शाहिद बलवा आणि अविनाश भोसले भागीदार आहेत. या कंपनीने रस्त्याच्या बदल्यात टीडीआर मागितला होता. त्याला महानगरपालिकेने नकार दिला होता. आता, सत्तांतर झाल्यावर पुन्हा त्या कंपनीने टीडीआरऐवजी त्याचे ७४ कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी केली. जो रस्ता १०० वर्षांपासून आहे, ज्याची मालकी केंद्र सरकारची आहे त्याचे पैसे या महाल फीचर्स कंपनीला देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. हा भ्रष्टाचार आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER