कोल्हापुरात मुसळधार पाऊस

Kolhapur Rains

कोल्हापूर :- परतीच्या पावसाने कोल्हापुरात दमदार हजेरी लावली आहे. गेले चार दिवस पडणाऱ्या पावसाने जनजीवनावर परिणाम केला आहे. दरम्यान, आता रात्री नऊ वाजता सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी तिव्रतेचे चक्रिवादळ आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावरून जमीनीवरून उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्राच्या भागावरून अरबी समुद्राकडे सरकत आहे. त्यामुळे राज्यातही काही प्रमाणात वेगाने वादळी वारे वाहत होते. उद्या (गुरूवारी) कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्हयात मेघगर्नजेसह मुसळधार होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER