विदर्भात राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग ; नागपुरात तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधणार

Jayant Patil - Satish Hole - Abha Pande

राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा (NCP Samvad Yatra) पक्षाला फायद्यात पडताना दिसून येत आहे. नागपूर (Nagpur) शहरातील तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला असून लवकरच ते बांधतील .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा सुरु आहे. या यात्रेचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु झालाय. प्रदेशाध्यश्र जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड विदर्भ दौऱ्यावर होती. यावेळी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठींचा कार्यक्रम पार पडला. याच दौऱ्यात शहरातील तीन नगरसेवकांनी जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. आभा पांडे, सतीश होले आणि मोहम्मद जमाल या नगरसेवकांनी जयंत पाटील यांची भेट घेतली.

आभा पांडे (Abha Pandey) या मुळात काँग्रेसच्या आहेत. नागपूर महापालिकेत त्या स्थायी समितीच्या अध्यक्ष होत्या. चार नगरसेवकांच्या प्रभागात त्या एकट्याच अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. यावरुन आभा पांडे यांच्या ताकदीचा अंदाज येतो. मागील काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. मात्र स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा भाजपप्रवेश होऊ शकला नाही.

सतिश होले (Satish Hole) यांनाही पक्षांतराचा बराच अनुभव आहे. त्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नंतर अपक्ष आणि नंतर भाजप असा प्रवास केला आहे. त्यांना जेव्हा काँग्रेसने उमेदवारी नाकारली तेव्हा त्यांनी अपक्ष निवडून येत काँग्रेसला आपली ताकद दाखवून दिली. मग त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र स्वपक्षियाच्या विरोधात त्यांनी बंड केल्याने भाजपमधून त्यांना निलंबित करण्यात आले .

उत्तर नागपूरमधील बहुजन समाज पार्टीचे काही नगरसेवक नाराज असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संबंधित नाराज नगरसेवकांनी भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER