शिवसेनेत जोरदार इनकमिंग ; आजऱ्यातील मुस्लिम बांधवाच्या हाती शिवबंधन

Maharashtra Today

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. आजरा तालुक्यातील शेकडो मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे (Vijay Devane)यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या बांधवांनी शिवबंधन(Shivbandhan) हाती बांधले . कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या बांधवांनी भगवा हाती घेतला .

रेहान बशीर तकीलदर, महम्मद तगारे, झहीर तकीलदार, झाकिर आगलावे, अबुलास दरवाजकर, मुन्ना लतीफ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या कार्यक्रमावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, उपशहरप्रमुख अनपाल तकीलदार, विभागप्रमुख इनायत लतीफ, उपशहरप्रमुख झुबेर चाँद, भिकाजी विभुते, महेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button