राज ठाकरेंच्या मनसेत जोरदार इनकमिंग; शिवसेनेसह विविध पक्षांतील कार्यकर्त्यांची कृष्णकुंजवर गर्दी

Raj Thackeray - Maharastra Today

मुंबई :- गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) (MNS) जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे दिसत आहे. आजही विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश करण्यासाठी कृष्णकुंजवर गर्दी केली होती . यामध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) उपस्थितीत आज मनसेत प्रवेश करतील. यात भांडुपमधील शिवसेनेच्या काही शाखांचाही समावेश आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी कंबर कसली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘मिर्झापूर असो की महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात’; मनसेकडून शिवसेनेवर जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER