जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; शंभूराज देसाईंचे आदेश

Maharashtra Today

सातारा :- कोरोना साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाबंदीची घोषणा केली. या घोषणेची अंमलबजावणीसंदर्भात आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सातारा-पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील सारोळा चेकपोस्टला भेट दिली आणि जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना त्यांनी यावेळी पोलिसांना केल्या.

या पार्श्वभूमीवर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर मलखेड येथील चेक पोस्टची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सरोला येथील चेक पोस्टवरील कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली आणि पोलिसांना कडक बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद आबा पाटील उपस्थित होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना सारोला चेक पोस्टवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर देसाईंनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना चेकनाक्यावरून फोन लावला व पुणे हद्दीवरील चेक नाक्याची माहिती घेतली.

यावेळी शंभूराज देसाई म्हणाले की, “राज्यात जिल्ह्याच्या नाकाबंदीची पोलीस खात्याकडून योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यात येत आहे. परवा रात्री ८ वाजल्यापासून राज्यातील पोलीस दल अलर्ट आहे. संपुर्ण राज्यात जिल्हा वाहतुकीची बंदी लागू केली आहे. वैद्यकीय, दुःखद घटनेचे किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय जिल्ह्याची हद्द सोडता येणार नाही. पोलिसांची नाकाबंदी चांगल्या पध्दतीने सुरू आहे. जनतेनेच आता प्रवास करणे टाळले पाहिजे. फारच गरज असेल तर परवानगी घेवून प्रवास करावा. पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत. जनतेनेही त्यांना सहकार्याची भूमिका ठेवावी. पोलिसांच्या प्रकृतीची काळजी शासन घेत आहे, तसेच जनतेनेही स्वत:ची, कुटुंबाची व पोलीसांची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन देसाई यांनी केले.

ही बातमी पण वाचा :  कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे ; पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’मधून संवाद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button