नव्या वर्षात वाहतुकीचे कडक नियम

New Traffic Rules

नवी दिल्ली : प्रदूषणासंदर्भातील वाहतुकीच्या नियमांच्या (Traffic Rules) उल्लंघनाबाबतची कारवाई अधिक कठोर होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत केलेली नियमावली १ जानेवारीपासून अमलात येत आहे. येत्या नवीन वर्षात १ जानेवारीपासून जर वाहनधारकाकडे पीयूसी सर्टिफिकेट (PUC Certificate) नसेल तर त्याच्या वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (Registration Certificate) जप्त होणार आहे.

याबाबतची सूचना रस्ते वाहतूक मंत्रालयाने २७ नोव्हेंबर रोजी काढली आहे. यानुसार, पीयूसी सिस्टीम ऑनलाईन करण्यापूर्वी सूचना मागविण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया दोन महिने सुरू राहील. नव्या सिस्टीमनुसार, वाहन मालकाची माहिती मोटार व्हेईकल डेटाबेसमध्ये अपलोड केली जाईल. यामुळे पीयूसी सर्टिफिकेटशिवाय लोकांना त्यांचे वाहन फिरवता येणार नाही.

वाहनचालकाला त्याचा मोबाईल नंबर द्यावा लागेल ज्यावर एक ओटीपी येईल. पीयूसी सर्टिफिकेट मिळणाऱ्या सेंटरवर हा ओटीपी दिल्याशिवाय सर्टिफिकेट मिळणे अशक्य असणार आहे. यामुळे या प्रक्रियेत काही घोटाळा होण्याच्या शक्यता आता थांबणार आहे. या नव्या प्रस्तावित सिस्टीमनुसार, निश्चित केलेल्या कालावधीनंतर पीयूसी सर्टिफिकेट पुन्हा नव्याने काढणे अनिवार्य ठरणार आहे. जर वाहनचालकाकडे पीयूसी सर्टिफिकेट नसेल तर त्यास सात दिवसांचा वेळ दिला जाईल. जर या कालवधीतही सर्टिफिकेट काढले नाही तर त्या वाहनधारकाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जप्त केले जाणार आहे. अधिकारी वाहनचालकाच्या वाहनातून अधिक धूर निघतो का, याची तपासणी करू शकणार आहेत. अशा चालकांनाही वाहनाच्या दुरुस्तीसाठी सात दिवसांची मुदत दिली जाणार आहे. हेच नियम कमर्शियल व्हेईकल्सनाही लागू असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER