या दोन राज्यांत कडक लॉकडाऊन

Lockdown

करोनाचे (Corona) वाढते रुग्ण आणि असणारी साथ रोखणे मोठे आव्हान ठरते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक राज्यांची स्थिती बिकट झाली आहे. राज्यांना लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घ्यावा लागतो आहे. मिझोरम आणि तामिळनाडू (Mizoram and Tamil Nadu) या दोन राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मिझोरमने ७ तर तामिळनाडूने १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.

मिझोरममध्ये १० मे ते १७ मे पहाटे ४ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. राज्याच्या सीमा खुल्या राहतील. राज्यात येणाऱ्या प्रवाशांना सीमेवर कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. १० दिवस आयसोलेशनमध्ये राहणे बंधनकारक असेल. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व मॉल्स आणि दुकाने बंद राहतील.

तामिळनाडूत १० ते २४ मेपर्यंत १४ दिवसांचा लॉकडाऊन राहील. दुपारी १२ वाजेपर्यंत किराणा दुकाने, भाज्या, मांस आणि मासे विक्री करणारी दुकाने सुरू राहतील. शनिवार – रविवार सर्व दुकाने सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलची पार्सल सेवा सुरू राहील. मात्र, दारूची दुकाने पूर्ण बंद असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button