कल्याण डोंबिवलीत उद्यापासून पुन्हा कडक लॉकडाऊन

Kalyan - Dombivli - Lockdown

मुंबई : मुंबईत कल्याण डोंबिवली येथे कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहून महानगरपालिकेने तेथे पुन्हा उद्यापासून १२ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व सार्वजनिक सेवांवर प्रतिबंध घालण्यात येत आहेत. असे कल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. २ जुलैपासून १२ जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.

सर्व हॉटस्पॉटमध्ये अत्यंत प्रभावीपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल. या कालावधीत खालील नियम व उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल.

 • १) अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूच्या ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरिता कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.
 • २) इंटरसिटी, एमएसआरटीसी बसेस आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी दिली जाणार नाही. टॅक्सी, ऑटोरिक्क्षा यांना परवानगी नाही.
  तथापि, आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी/देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. या ऑर्डर अंतर्गत ड्रायव्हरशिवाय केवळ एका प्रवाशासह खाजगी वाहनांना, परवानगी असलेल्या जीवनावश्यक वस्तू, आरोग्यसेवा आणि या ऑर्डर अंतर्गत मान्य कृतीकरिता परवानगी असेल.
 • ३) सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे (खाजगी वाहनांसह) तसेच खाजगी ऑपरेटरकडून कामकाज बंद असेल तथापि बाहेरून येऊन, बाहेर जाणाऱ्या टुरिस्ट वाहनांना परवानगी असेल.
 • ४) ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्याचे सक्त पालन केले पाहिजे. नाही तर ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल आणि तिला/त्याला महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल.
 • ५) सर्व रहिवासी घरीच राहतील आणि सामाजिक परवानगीच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून, वरील परिच्छेद-२ मध्ये नमूद केलेल्या अटींचे पालन करून, केवळ परवानगी असलेल्या कामासाठीच बाहेर जाता येईल.
 • ६) व्यावसायिक आस्थापना कार्यालये आणि कारखाने, कार्यशाळा, गोदाम यासह सर्व दुकाने त्यांचे कामकाज बंद ठेवतील. तथापि, सतत प्रक्रिया आणि फार्मास्युटिकल्स आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिट्सना परवानगी असेल. पुढे डाळ व तांदूळ गिरणी, दुग्धशाळा, खाद्य व चारा इत्यादींच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेला मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालविण्यास परवानगी असेल.
 • ७) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीतकमी कर्मचाऱ्यांसह ऑपरेट करण्याची परवानगी असेल आणि ते चेक काउंटरजवळ एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवणे अशा सामाजिक अंतराची खात्री करण्यासाठी पावले उचलतील. ते त्यांच्या आवारात योग्य स्वच्छता आणि सॅनिटायझर्स/ हात पुण्याच्या सुविधा उपलब्धता सुनिश्चित करतील.
 • ८) आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या खालील दुकाने आस्थापनांना वरील प्रतिबंधामधून वगळण्यात येत आहे.
  a) जीवनावश्यक वस्तूची दुकाने, दूध, दुग्धजन्य दुकाने (डेअरी), बेकरी, किराणा दुकाने, भाजीपाला इत्यादी खाद्यपदार्थ आस्थापना सकाळी ९ ते सायकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. सदर सर्व दुकाने, त्या दुकानातून काउंटरवरून वस्तूची विक्री न करता घरपोच या मालाची विकी करावी. तथापि “मेडिकल स्टोअर्स, रुग्णालय/ क्लिनिक, एलपीजी गॅस सिलेंडर, उद्वाहन दुरुस्ती (LIFT) ही दुकाने सुरू ठेवण्यासाठी उक्त मर्यादा लागू असणार नाही.
  b) दूध विक्रीची दुकाने ही सकाळी ५ ते १० या कालावधीत सुरू ठेवून विक्री करता येईल.
  c) संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी व प्रतिबंधित क्षेत्रासाठी गठित करण्यात आलेल्या कोरोना समितीने जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला परपोषी पुरविणे कामी आवश्यक ते नियोजन करून सदर बसने नागरिकांना घरपोच सेवेद्वारे उपलब्ध होतील.
 • ९) या नियमांच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती/संस्था यांच्यावर [महामारी रोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, च्या अंतर्गत इतर संबंधित कायदे व नियमांच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.
 • १० ) या नियमानुसार कोणत्याही गोष्टी केल्यास किंवा चागल्या हेतूने कोणत्याही गोष्टी केल्यास, त्या व्यक्तीविरुद्ध खटला किंवा कायदेशीर कारवाई होणार नाही.
 • ११) विविध प्राधिकारणाद्वारे, पूर्वी जारी केलेले सर्व आदेश अंमलबजावणी संस्था, या आदेशासह अधिक्रमित केले जातील.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER