कर्नाटकमध्ये लवकरच होणार ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कडक कायदा : येडियुरप्पा

Yeddyurappa

बेंगळुरू : लव्ह जिहाद संपुष्टात आणण्यासाठी कर्नाटक सरकार कडक पावल उचलणार आहे, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Yeddyurappa) यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून देशात “लव्ह जिहाद” (love jihad) विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापते आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे.

येडियुरप्पा म्हणालेत, आम्ही वृत्तपत्रं व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्म परिवर्तनाच्या बातम्या पाहिल्या आहेत. मी यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. इतर राज्य याबद्दल निर्णय घेतील की नाही याची मला पर्वा नाही, मात्र कर्नाटकात मला हे संपवायचे आहे. येत्या दोन -तीन दिवसांत आम्ही याबाबत निर्णय घेऊ.

या आधी कर्नाटकचे गृहमंत्री बोमानी यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याचे संकेत दिले होते. लव्ह जिहाद हा एक सामाजिक दानव आहे. असे त्यांनी म्हटले होते. आम्ही याबाबत विचार करत आहोत की, या विरोधात आपण काय पावलं उचलू शकतो. यासंदर्भात आम्ही कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहोत, असे ते म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER