लॉकडाऊनबाबत खोटी माहिती दिल्यास कठोर कारवाई होणार, गृहमंत्र्यांचा इशारा

anil deshmukh

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. विदर्भातील काही जिल्ह्यात लॉकडाऊन (Lockdown) तर काही जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये बंद करण्यासोबतच रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुकानांना वेळाही ठरवून दिल्या गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊनबाबत खोटी माहिती सध्या सोशल मीडियावर पसरवली जात आहे. त्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशाप्रकारे खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

‘महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत’, असं ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन बाबत खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर आला कारवाई होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER