कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा; पोलीस आयुक्तांचे आदेश

Amitabh Gupta

पुणे :- शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांकडून विनामास्क भटकणे, सोशल डिस्टन्स न पाळणे तसेच नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी दिले आहेत.

शहरात कोरोना (Corona) बाधितांची संख्या वाढत असताना नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. शहरातील विविध चौकात विनामास्क वाहन चालकांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मास्क न घालता प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करून ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. तरीही अनेक जण नियम भंग करत आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात मास्कची कारवाई केली जात आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरावे, सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

विनामास्क कारवाईतून २१ कोटींचा दंड वसूल

विनामास्क नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून आतापर्यंत २ लाख ५१ हजार ८६६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. यांच्याकडून तब्बल २१ कोटी २४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे विनामास्क कारवाईचा वेग वाढविण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER