संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत ठरणार मराठा आंदोलनाची रणनीती

Sambhaji Raje-Maratha Reservation

मुंबई : सुप्रीम कोर्टानं (SC) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती दिल्यानंतर मराठा आंदोलन पुन्हा पेटले आहे. आता मराठा समाजाने आंदोलनाचा मोर्चा नाशिक येथे वळविला आहे . सर्व मराठा संघटना नाशकात एकाच छताखाली एकत्र आल्या आहेत. मराठा संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात झाली आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje chhatrapati) हे या बैठकीला उपस्थित आहेत. तर खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधी म्हणून यशराजे पाटील या बैठकीत सहभागी झाले आहेत. त्याबरोबर राज्यातील २२ जिल्ह्यांचे समन्वयक सहभागी झाले आहेत. मराठा आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी ही महत्त्वाची बैठक असल्याची माहिती आहे . मराठा आंदोलनाबाबत या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER