अजब : चोरट्यांचा कोल्हापुरात कांद्यावर डल्ला

Onion Theiv

कोल्हापूर : सध्या कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याने शंभरी गाठल्याने गृहिणींसमोर मोठा पेच आहे. अशा वेळी कांद्याची पळवापळवी सुरू झाली आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या दुकानांवर चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

वाढत्या कांद्याच्या दराचा फायदा घेत कोल्हापुरातील मार्केट यार्डातील कांदा व्यापाऱ्यांच्या गोदामाचा पत्रा उचकटून कांद्याची १२ पोती चोरून नेली आहेत. याबाबत व्यापारी प्रकाश उत्तमचंद्र उंब्रराणी यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER