५० पैसे ते १६०० कोटी रुपयांची गरूडझेप घेणाऱ्या महिल्या उद्योगाची ‘लिज्जत’ कहाणी…!

९०च्या दशकात लिज्जत पापडाच्या (Lijjat papad) जाहिरातींनी घराघरात प्रवेश केला. त्याच्या जाहिरातीची सगळीकडं चर्चा होती. तो काळ होता जेव्हा देश उदारीकरणाच्या प्रक्रियेचा हिस्सा बनला होता. टीव्हीनं भारतीयांच्या हॉलचा ताबा घ्यायला सुरुवात केली होती. याच टीव्हीच्या माध्यमातून लिज्जत पापड घराघरात पोहचला होता लिज्जत पापडाचा स्वाद.

लिज्जत पापडाच्या त्या जिंगल्सनं वाढदिवसाच्या पार्ट्यांचा ताबा घेतला होता. मुलाचे आई वडील या गाण्यावर ठेका धरायचे. इतकी प्रसिद्धी या जिंगल्सने कमावली. एकीकडं देशवासीयांच्या मनात लिज्जत पापडाने जागा मिळवली तर दुसरीकडं लिज्ज पापडने लाखोंची मनं जिंकून घेतली. लिज्जत पापडाशिवाय जेवणच पूर्ण होत नाही असं गुजरातेत मानलं जातं.

या ब्रँडची सुरुवात ७ गुजराती महिलांनी ५० पैसे प्रतिदीन कमाईतून. आता या उद्योगाची उलाढाल १६०० कोटींपर्यंत पोहोचलीये.

अशी झाली सुरुवात

ही गोष्टय १९५९ची. मुंबई तेव्हा बॉंम्बे होती. उन्हाळ्याच्य हंगामात सात गुजराती महिला वित्तीय तणावातून दुर होवून नवा मार्ग शोधण्यासाठी उपजीवकेच्या साधनावर विचार करत होत्या. न त्यांच शिक्षण पूर्ण झालं होतं न त्यांना कंपनी चालवण्याचा काही अनूभव होता.

शेवटी बराच वेळ चर्चा करुन त्यांनी एक स्थिर उत्पन्न कमवण्यासाठी पापड बनवण्याचा निर्णय घेतला. ज्यात त्यांना हतकंडा ही होता. यानंतर त्यांनी पापड बनवण्या निर्णय घेतला.

यानंतर जसवंतीबेन पोपट, जयबेन विठलानी, पार्वतीबेन थोडानी, उजंबेन कुंडलिया, बानुबेन तन्ना, चुटादबेन गावडे आणि लगुबेन गोकानी यांनी स्थानिक बाजारात पापड विकायला सुरुवात केली.

“आमचे शिक्षण जास्त नव्हते. त्यामुळं नोकरीची संधीही त्यांच्याजवळ नव्हती. पण आम्हाला याची पुर्ती जाणीव होती की पापड बनवण्यात असलेला हातखंडा कुटुंबासमोरील आर्थिक संकटांना दूर लोटू शकतो.” जसवंतीबेन यांनी एका मुलाखतीत हे सांगितलं.

यानंतर पुरषोत्तम दामोदर दत्तानी यांनी या महिलांना पापड विकण्यास मदत केली. दत्तानी यांनी पापड घेवून गिरगाव चौपाडी परिसरातील दुकानात विकायला सुरुवात केली. इथल्या आनंदजी प्रेमजी अँड कंपनी नावाच्या एका स्टोअरमध्ये त्यांनी पापड विकले. या दुकानाचे मालक आनंदजी यांना महिलांची मेहनत प्रामाणिक वाटली. त्यांनी या व्यवसायाला पुढं नेण्यासाठी शक्य ती मदत करण्याचं ठरवलं. आज ते रोजचे २५ किलो पापड खरेदी करतात.

जसवंती बेन यांनी पहिल्यादिवशी एक किलो पापड बनवले आणि त्यातून ५० पैशांची कमाई केली. पुढच्या दिवशी दोन किलोचे एक रुपये मिळाले. त्यांच्या परिसरातील महिलांना यातला फायदा दिसला. यानंतर जसवंतीबेन यांनी टीम बनवायला सुरुवात केली.

पुढच्या तीन चार महिन्यात त्यांच्या सहकारी संस्थेशी २०० महिलांनी स्वतःला जोडून घेतलं. यानंतर वडाळ्यात दुसरी शाखा सुरु झाली. ५० पैशातून सुरु झालेल्या या व्यवसायाच्या पहिल्याच वर्षी म्हणजे १९५९ला या महिलांनी ६ हजार रुपये कमावले जी त्यावेळची मोठी रक्कम होती.

बाजारात लिज्जत पापडाची मागणी वाढायला लागली. तेव्हा ही बाब लक्षात घेवून या सात महिलांनी छगनलाल करमसी पारेख यांच्याकडून पैसे उधार घेतले. ते या महिलांचे व्यवसायातले गुरु बनले. ‘छगनबप्पा’ च्या नावाने ओळखले जाणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्यांनी १९५०च्या दशकात कच्छ भुकंपासह इतर आपत्तीतील लोकांना चांगली मदत पुरवली होती.

सुरुवातीच्या काळात जाहिरात आणि मार्केटींगवर खर्च न करता सारी उर्जा गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. संस्थेशी अधिकाधिक महिला जोडून घेत होत्या. तेव्हा संस्थापकांना वाटलं की या उद्योगाला वैधानिक मान्यता मिळावी. यासाठी १९६६ला संस्थेची नोंद घातली. १८६० बॉंम्बे ट्रस्ट अॅक्ट अनूसार त्यांनी संस्थेची नोंद घातली. याच वर्षी खादी आणि ग्रामउद्योग आयोगाने या उद्योगाला ‘ग्रामउद्योग’ म्हणून मान्यता दिली. संस्थापकांसाठी ही मोठी उपलब्धी होती.

आज ६२ वर्षांनंतर सात महिलांनी सुरु केलेला हा व्यवसाय भारताच्या सर्वात जुन्या महिला सहकारी समितीच्या रुपात बदललाय. जो आज ४५ हजार महिलांना रोजगार पुरवण्यात येतो.

१९६८ला लिज्जनं महाराष्ट्राबाहेर गुजरातच्या वलोदमध्ये पहिली शाखा सुरु केली. आजघडीला या उद्योगाच्या देशभरात ८२ शाखा आहेत. आणि १५ देशात याच्या उत्पादनाची निर्यात केली जाते. पापडांसोबतच गहू, मसाले, डिटर्जेंट पावडर इत्यादी उत्पादने लिज्जतने बाजारात आणलीयेत.

गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती हाच ६० वर्षांच्या यशस्वी व्यवसायाचे गमक असल्याचं श्रीमहिला गृह उद्योग लिज्जत पापड संस्थेच्या अध्यक्ष स्वाती पराडकर सांगतात.

ह्या बातम्या पण वाचा  :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER