विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

stormy-rain-likely-in vidarbha

नागपूर :- विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे. परिणामी पुढील तीन दिवस विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ३ जानेवारीनंतर पुन्हा एकदा विदर्भात थंडीची लाट येणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

दोन दिवस कडाक्‍याच्या थंडीने परीक्षा घेतल्यानंतर आता वैदर्भींवर अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने मंगळवारपासून दोन-तीन दिवस संपूर्ण विदर्भासह वादळी पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कमी होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबरमध्ये दरवर्षी थंडीचं प्रवाण वाढतं. यावर्षी देखील ते कायम आहे.