गुजरात, महाराष्ट्राला वादळाचा इशारा

Monsoon

दिल्ली : हवामान विभागाने दक्षिण गुजरात आणि महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीसाठी वादळाचा अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रात दक्षिणपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानेच हे वादळ येणार आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने एका विशेष बुलेटिनमधून हा इशारा जाहीर केला आहे. आगामी २४ तासात वादळाचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांना त्यासाठीच धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडीने दिलेल्या अलर्टनुसार या वादळाचा परिणाम २ जून रोजी उत्तर भागात होईल व उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातची किनारपट्टी याठिकाणी ३ जून रोजी याचा प्रभाव दिसेल.

दक्षिण – पश्चिम मान्सून हा केरळमध्ये १ जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. देशाच्या उत्तरेकडील भागात वेगवान वाऱ्यासह पडलेल्या पावसाने दिल्लीतले तापमान काही अंशी कमी झाले आहे. हरयाणा आणि उत्तर प्रदेश येथे आज रात्री उशिरा ताशी ३० ते ५० वेगाच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER