अमेरिकेत ‘या’ लसीचा वापर थांबवला; प्रशासनाचे आदेश !

Johnson & Johnson's vaccine

वॉशिंग्टन :- कोरोनाच्या थैमानाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू आहे. अमेरिकेत फायजर, मॉडर्ना आणि जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या लसींचा वापर सुरू आहे. मात्र, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या लसीचा वापर काही काळासाठी थांबवण्याची सूचना केली आहे. अमेरिकेत ही लस वापरल्यानंतर सहा  जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे समोर आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

अमेरिकेत आतापर्यंत ६.८ मिलियन जणांना ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ची लस देण्यात आली आहे. त्यापैकी सहा  जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या, असे अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे. रक्ताची गाठ झाल्याची तक्रार करणाऱ्या महिला १८ ते ४८ या वयोगटातील आहेत. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’च्या कोरोना लसीचा एकच डोस घ्यावा लागतो. तर, इतर लसींचे दोन डोस घ्यावे लागतात.

अमेरिकेत काही महिन्यांपूर्वीच ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’च्या लसीला मंजुरी दिली होती. या लसीची चाचणी तीन खंडांमध्ये केली होती. अमेरिकेत गंभीर आजाराविरोधात ८५.९ टक्के, दक्षिण आफ्रिकेत ८१.७ टक्के आणि ब्राझीलमध्ये ८७.६ टक्के ही लस सुरक्षित असल्याचे आढळून आले होते. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ने याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लसीचा आणि रक्ताच्या गाठीचा संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणी प्राधिकरणांशी संपर्कात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button