रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी; केंद्र सरकारचा निर्णय

remdesivir - Maharastra Today
remdesivir - Maharastra Today

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. अशा स्थितीत कोरोना लसीपासून रेमडेसिवीर इंजेक्शनपर्यंतचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. भारत सरकारने रेमडेसिवीरची निर्यात थांबवली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे आहे.

देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होत आहे. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा साठा पूर्णपणे संपला आहे. तसेच फक्त सरकारी रुग्णालयात रेमडेसिवीर उपलब्ध आहे. याच अनुषंगाने सरकारने रेमडेसिवीरची  निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे सुधारत नाही तोपर्यंत रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. माहितीनुसार, ज्या स्थानिक कंपन्या रेमडेसिवीर उत्पादन करतात त्यांच्या वेबसाईटवर संपूर्ण साठ्याची माहिती टाकावी लागणार आहे.

तसेच कोणत्या वितरकाच्या माध्यमातून पुरवठा करत आहेत, हेसुद्धा वेबसाईटवर टाकणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर जे औषध निरीक्षक आहेत आणि जे कोणी या संबंधित अधिकारी आहेत, त्यांना रेमडेसिवीरचा साठा किती शिल्लक आणि रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी कोणते पाऊल उचलतात, हे त्यांना जाहीर करावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button