सेंट्रल विस्टाचं काम थांबवा, लसीकरणासाठी पीएम केअर फंडचा पैसा खर्च करा; विरोधी पक्षांची मागणी

Central Vista Redevelopment Project - Coronavirus Vaccine - Opposition Leaders - PM Narendra Modi

नवी दिल्ली : देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर देशातील १२ प्रमुख पक्षांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. यामध्ये शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधींचा (Sonia Gandhi) समावेश आहे. या पत्रातून विरोधकांनी मोदींना (PM Narendra Modi) कोरोनाच्या (Corona) संकटामुळे सेंट्रल विस्टाचं (Central Vista Redevelopment Project) काम थांबवण्यासह ९ सल्ले देण्यात आले आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, जेडीएसचे नेते एचडी देवगौडा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी, डीएमके नेते एमके स्टॅलिन, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, सीपीआय नेते डी. राजा आणि सीपीआयचे नेते सीताराम येचुरी आदींच्या या खुल्या पत्रावर सह्या आहेत. या पत्रात मोफत लसीकरण करणे, सेंट्रल विस्टा प्रकल्प बंद करणे आणि त्याचा पैसा आरोग्य व्यवस्थेवर लावणे तसेच बेरोजगारांना 6 हजार रुपये मासिक भत्ता देणे आदी मागणी केली आहे.

विरोधकांनी कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच एकत्रित येऊन पंतप्रधा नरेंद्र मोदींना खुले पत्रं लिहिलं आहे. त्यामुळे मोदींची कोंडी होण्याची शक्यता आहे. आगामी काळात कोरोनाची स्थिती नियंत्रणात न आल्यास विरोधक अधिकच आक्रमक होण्याची चिन्हेही या निमित्ताने दिसत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. मोफत लसीकरण, सेंट्रल विस्टा प्रकल्प बंद करून त्यासाठी खर्च होत असलेला पैसा आरोग्य सुविधांवर खर्च करण्यात यावा अशा प्रमुख मागण्या पत्रातून करण्यात आल्या आहेत. बेरोजगारांना महिन्याला ६ हजार रुपयांचा भत्ता देण्याची मागणीदेखील पत्रातून करण्यात आली आहे.

विरोधकांच्या नऊ मागण्या

– जिथून शक्य होईल तिथून व्हॅक्सीन खरेदी करा, मग ती देशातून किंवा विदेशातून
– संपूर्ण देशात तात्काळ व्यापक लसीकरण सुरू करा
– देशांतर्गत लसीकरणासाठी आवश्यक लायसेंसिंग लागू करा
– व्हॅक्सिनसाठी 35 हजार कोटींचा बजेट ठेवा
– सेंट्रल विस्टा प्रोग्राम थांबवा. त्यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद व्हॅक्सिन आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरा
– पीएम केअर फंड आणि सर्व खासगी फंडासाठी फंडातील सर्व जमा रक्कम बाहेर काढा आणि त्यातून ऑक्सिजन तसेच मेडिकल उपकरणे खरेदी करा
– बेरोजगारांना 6 हजार रुपये दरमहा भत्ता द्या
– सर्व गरजूंना मोफत अन्नधान्य द्या
– महामारीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतीकामाकडे लक्ष देता यावे म्हणून कृषी कायदा मागे घ्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button