कांजूर मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवा; ठाकरे सरकारला उच्च न्यायालयाचा फटका

CM Uddhav Thackeray - Kanjurmarg Metro Car Shed - Bombay High Court

मुंबई : कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे (Kanjurmarg Metro Car Shed) काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने (Bombay High Court) दिले असून ठाकरे सरकारला (Thackeray Government) मोठा दणका दिला आहे. तसेच भूखंडाची स्थिती आहे तशीच ठेवण्यास सांगितलं आहे. यासोबत जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर आज सुनावणी पार पडली. फेब्रुवारीत याप्रकऱणी अंतिम सुनावणी सुरु होणार आहे.

आरे वसाहतीत कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींनी केलेल्या विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) मेट्रो कारशेडसाठी कांजूर येथील जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यावर आज सुनावणी झाली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER