कोरोनासाठी रेमडेसिवीरचा वापर बंद; जागतिक आरोग्य संघटनेचे स्पष्टीकरण

WHO - Remdesivir

मुंबई :- कोरोना (Corona) रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir) वापर केला जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर दुसरीकडे रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होताना दिसत आहे. साधारण दीड हजार रुपये किमतीचं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल ३५ ते ४० हजारांपर्यंत विकलं गेलं. इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी अटकही केली. पण आता कोरोना रुग्णावरील उपचारासाठी रेमडेसिवीर वापरलं जाणार नसल्याचं जागतिक आरोग्य संघटना (WHO) अर्थात डब्लूएचओनं स्पष्ट केलं आहे.

कोरोनाचा रुग्ण कितीही गंभीर असला तरी त्याच्यावर रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यानंतरही कुठलाच परिणाम दिसला नाही, असे स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन हे कोरोनावर प्रभावी आहे, असा कुठलाही पुरावा मिळाला नाही, असं डब्लूएचओने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन आता कोरोना उपचारातून वगळण्यात आल्याची माहिती डब्लूएचओने दिली आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं लिहिलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डब्लूएचओच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, ‘आम्ही Prequalification list मधून रेमडेसिवीर वगळले आहे. डब्लूएचओकडून हा त्या देशांसाठी संदेश आहे, जे डब्लूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करतात. डब्लूएचओ आता त्या देशांना रेमडेसिवीर घेण्याची शिफारस करत नाही.’ त्याचबरोबर डब्लूएचओने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीरचा वापर करू नका, असा इशारा दिला. कारण, गंभीर रुग्णांवरही रेमडेसिवीरचा कुठलाही परिणाम दिसून आल्याचे पुरावे नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button