कोरोनाची तिसरी लाट थांबवू अन् नक्कीच विजय मिळवू; डॉ. तात्याराव लहानेंचा आत्मविश्वास

tatyarao lahane - Maharashtra Today

मुंबई :- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर नियंत्रण मिळवले आहे. ‘आम्ही कोरोनाची तिसरी लाट थांबवू आणि त्यावर नक्कीच विजय मिळवू.’ असा आत्मविश्वास टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला आहे. जय महाराष्ट्र नगरात वसंत व्याख्यानमालेचे फेसबुक लाईव्ह (Facebook Live) माध्यमातून काल रात्री ‘मास्क हा आपल्या कपड्यांबरोबरचा एक अविभाज्य भाग आहे.’ असे आवर्जून त्यांनी नमूद केले.

फेसबुक लाईव्हमध्ये डॉ. तात्याराव लहाने यांनी कोरोनाविरुद्धच्या युद्धादरम्यान महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या उपायांची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे परोपकारी नेतृत्व आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा शासकीय यंत्रणेला मोठा फायदा झाला. वैद्यकीय आणि शास्त्रीय या बाबींची सांगड घालून योग्य निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आपण सर्व आरोग्य यंत्रणा आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांच्या समन्वयाने कोरोनावर नियंत्रण आणू शकलो, हे डॉ. लहाने यांनी आवर्जून सांगितले.

मास्क लावणे, सॅनिटाईझ करणे आणि सतत हात धुणे या अतिशय सोप्या गोष्टी आहेत. डॉ. लहाने यांनी आजही ५० टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे सांगितले. यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याचे नमूद केले. आळीपाळीने चहा-भोजनाचे सेवन करता येते. आपण घरातून बाहेर पडल्यावर शर्ट-पँट काढतो का, नाही ना? तसेच मास्कसुद्धा आता कपड्याचा अविभाज्य भाग झाला आहे. कोरोनाचे नियम पाळल्यास दुसरी लाट नियंत्रणात आणून तिसरी लाट थोपविण्यात आपण निश्चितच यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करणे बंद करावे. अशा प्रकारांमुळे वैद्यकीय यंत्रणेत असुरक्षिततेची भावना निर्माण होते, अशी नाराजी डॉ. लहाने यांनी व्यक्त केली. लोकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. आपल्याला काहीही होणार नाही, मानसिकरीत्या मजबूत राहणे गरजेचे आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने हलगर्जीपणा योग्य नाही. लोकांनी हक्कांबरोबर कर्तव्याचीही जाणीव ठेवणे आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा डॉ. लहाने  यांनी जाणीवपूर्वक सांगितल्या.

ही बातमी पण वाचा : कोरोना नियंत्रणाबाबत अपेक्षित यश मिळालेले नाही; मुख्यमंत्र्यांचे लॉकडाउनबद्दल सूचक विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button