सामानातून छत्रपतींच्या वंशजांना लक्ष्य करणे बंद करा, राऊतांना मराठा आंदोलकांचा इशारा

Sanjay Raut

जालना : सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाच्या मुद्याला स्थगिती देण्याल आल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यानं जोर धरला धरला आहे. आणि अशातच शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखात खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी “जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करण्यासारखी स्थिती नाही, असा टोला लगावला होता, त्यावरून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

संजय राऊत तुम्हाला एकच इशारा आहे, दरवेळी तुम्ही ‘सामना’तील अग्रलेखाच्या माध्यमातून आमच्या समाजाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना लक्ष्य करता, आता आम्ही हे खपवून घेणार नाही. तुम्ही ताबडतोब माफी मागा. जर माफी न मागता तुम्ही मराठवाड्यात आलात तर मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पंकज जऱ्हाड यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता मराठा क्रांती मोर्चा, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले यांचे चाहते संतप्त झाले असून संजय राऊतांना प्रत्युत्तर देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER