महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा; नवनीत राणांची राजनाथ सिंहांना विनंती

Navneet Rana - Rajnath Singh

मुंबई : शिवसैनिकांकडून (Shiv Sena) माजी नौदल अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा घटनेवर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी संताप व्यक्त केला आहे . यावरून काल त्यांनी शिवसेनेवर टीकाही केली होती. यानंतर सोमवारी नवनीत राणा यांनी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा, अशा विनंतीचे निवेदनही सिंह यांच्याकडे दिले आहे .

यापूर्वी राजनाथ सिंह यांनीदेखील मदन शर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. यानंतर राजनाथ सिंह यांनी ट्विट करून, माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच दिला होता.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी या अधिकाऱ्याला मारहाण केली. विरोधकांनी या मुद्द्यावरून शिवसेनेला चांगलेच घेरले आहे . तसेच मारहाण झालेल्या मदन शर्मा नामक या नौदल अधिकाऱ्याने . कायदा-सुव्यवस्थान संभाळणे जमत नसेल, तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या अधिकाऱ्याने केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER