रामदेवबाबांचे गोबर, गोमूत्र थेरपी बंद करा; नवाब मलिकांची मागणी

Maharashtra Today

मुंबई :- योगगुरू रामदेव बाबांसारखे (Ramdev Baba)लोक गोमूत्र, गोबर आणि कोरोनिल काढतात. अ‍ॅलोपॅथीविरोधात कथित वक्तव्य केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शनिवारी योगगुरू रामदेव यांना कायदेशीर नोटीस पाठविली. तसेच गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच बंद करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे. रामदेव जनतेत भीती व निराशा निर्माण करत आहेत. आयएमएने म्हटले आहे की, वैज्ञानिक औषधांची बदनामी करून लोकांना खंडणीसाठी घेऊन जाणे आणि व्यवसाय जिंकणे हे निषेधार्ह गुन्हे आहेत.

ही बातमी पण वाचा : अॅलोपॅथिक सायन्सबाबतच्या रामदेवबाबांच्या अवमानजनक वक्त्यव्याचा आएमएने केला निषेध

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना रामदेवबाबांपासून ते केंद्र सरकारवर टीका केली. देशात कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. अशावेळी गोमूत्र प्यायला सांगितले जात आहे. रामदेवबाबा सारख्यांच्या औषधांच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री जातात. हे नियम आणि कायद्याला धरून नाही. याचा आरोग्य मंत्रालयाने विचार केला पाहिजे. ज्या औषधांना वैद्यकीय मान्यता नाही, याबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे. जे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असे नवाब मलिक म्हणाले.

 Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button