लसीकरणावरून आता तरी राजकारण थांबवा; प्रवीण दरेकरांनी सरकारला केले लक्ष्य

CM Uddhav Thackeray - Coronavirus Vaccine - Pravin Darekar - Maharashtra Today
CM Uddhav Thackeray - Coronavirus Vaccine - Pravin Darekar - Maharashtra Today

मुंबई : राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केला. मात्र, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्य सरकारला या मुद्द्यावरून लक्ष्य केले आहे. “लसीकरण सुलभ करण्याची केंद्राचीही मानसिकता आहे आणि आमचीही आहे. पण नियोजनाचा भाग राज्य सरकारचा आहे. मुंबईत एक ते दीड लाख लसी उपलब्ध असताना ४० ते ५० केंद्रे बंद होती. आता तरी यामध्ये राजकारण करू नका. केंद्र सरकारसोबत समन्वयातून लस उपलब्ध करून घेऊन जनतेचे लसीकरण (Vaccination) निश्चित वेळेत व्हायला हवे. ते फार लांबणे जनतेच्या जीविताच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही.” असे प्रवीण दरेकर म्हणाले.

“निश्चित वेळेत लसीकरण झाले नाही, तर संकटाला सामोरे जावे लागेल, ते आपल्याला परवडणार नाही. जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून घेणे, केंद्र सरकारशी वाद न करता समन्वय ठेवणे, १ मेपासून खासगी स्तरावर अधिक लस उपलब्ध करून देण्याची व अधिक चांगले लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. कारण सहा महिने हा खूप मोठा कालावधी आहे. त्यामुळे युद्धपातळीवर लस उपलब्ध करून देण्याची गरज आहे.” असे दरेकर म्हणाले.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासोबतच लसींचा साठा अपुरा असल्यामुळे १ मेपासून राज्यात या वयोगटासाठी लसीकरण सुरू करता येणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. या मुद्द्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका होत आहे.

दरेकरांचे सरकारला आव्हान
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीर (Remdesivir) पुरवठ्याबाबत प्रवीण दरेकरांनी थेट राज्य सरकारला आव्हान दिले आहे. “माझी जाहीर मागणी आहे. केंद्राने किती रेमडेसिवीर दिली? राज्य सरकारकडे किती आली? याची आकडेवारी जनतेसमोर जाहीर करा. किती रेमडेसिवीर वाटली? हॉस्पिटलमध्ये कशी वाटली? किती जनतेला दिली? हे समोर आले पाहिजे. सरकारला आलेली रेमडेसिवीर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडून घेतली आणि आपल्या बगलबच्च्यांना वाटली. सुजय विखे-पाटलांना (Sujay Vikhe-Patil) चोर म्हणून आपण भुई थोपटतोय. पण अनेक छुपे चोर आहेत, ज्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडून रेमडेसिवीर घेतले आहेत. एकदा आकडेवारी समोर येऊ द्या. म्हणजे या सगळ्या गोष्टींवर एकदाचा पडदा पडेल.” असे दरेकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button