शासकीय लसीकरण केंद्रांवरील राजकीय जाहिरातबाजी थांबवा; मनसेचा सत्ताधाऱ्यांना इशारा

Raj Thackeray

मुंबई : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने देशासह महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी सर्वांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडूनही (Mahavikas Aghadi) राज्याच्या प्रत्येक शहरात, तालुक्यात आणि गावागावांमध्ये लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मात्र अशा शासकीय लसीकरण केंद्रावर राजकीय हस्तक्षेप होताना दिसत आहे. लसीकरण केंद्राच्या बाहेर, खासदार, आमदार आणि नगरसेवकांचे बॅनर झळकत आहेत. यावरूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) सत्ताधाऱ्यांना सल्लावजा इशारा दिला आहे.

शासकीय लसीकरण केंद्रांवर काही राजकीय पक्षांनी स्वतःचे फलक लावून जाहिरातबाजी सुरू केली आहे. मुळात लसींच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि त्यात शासनाच्या खर्चामुळे चालणाऱ्या केंद्रांवर राजकीय बॅनर्सची जाहिरातबाजी, हा उबग आणणारा प्रकार आहे. आणि हा प्रकार सत्ताधारी पक्षांनी तर टाळायलाच हवा; कारण योग्य पायंडा पाडायची जबाबदारी तुमची आहे हे विसरू नका. जाहिरातबाजीचे हे प्रकार अनेक ठिकाणी महाराष्ट्र सैनिकांनी उघडकीस आणलेत, अर्थात ही आंदोलनांची वेळ नाही. त्यामुळे महाराष्ट्र सैनिक सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारून ह्या बाबी उघडकीस आणत आहेत आणि तसंच पुढेदेखील करतील; पण सत्ताधारी पक्षांनी बोध घेऊन स्वतःची कृती सुधारावी हीच आमची अपेक्षा आहे, असे म्हणत मनसेने सत्ताधाऱ्यांना सल्लावजा इशारा दिला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button